हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘लेट मार्क’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-harbour-line-local-trains-delayed-due-to-technical-glitch-passenger-rush

>> गणेश पुराणिक

महिन्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर मार्गावरील उपनगरीय वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल 40-45 मिनिटे उशिराने धावत आहेत. उपनगरीय लोकल सेवेचे तीनतेरा वाजल्याने सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला ‘लेट मार्क’ लागला. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

 

बुधवारी सकाळी हार्बर मार्गावरील लोकल सेवा कोलमडली होती. जुईनगर ते नेरूळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास 40-45 मिनिटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल अशी अप डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी 5.28 ची लोकल 6.15 वाजता खारघर येथे आली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. महिन्याचा पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला.

https://youtube.com/shorts/S0fwrK4X4sU?feature=share