पावसाचे लॉकडाऊन, आजही अतिजोरदार, दुपारी 12.23 वाजता उधाण

730
(सर्व फोटो - रुपेश जाधव)

मुंबईत शुक्रवारपासून सुरू झालेला तुफान पाऊस आज शनिवारीही चांगलाच बरसला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. यातच सकाळी 11.38 वाजताच्या सुमारास समुद्राला उधाण आल्याने तब्बल 5 मीटर उंचीच्या प्रचंड लाटा उसळल्या. संपूर्ण दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या तुफान पावसामुळे वाहतूकही मंदावली. मुंबई ‘लॉकडाऊन’ झाली.

हवामान खात्याने पुढील 24 तासांतही जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यातच उद्या 5 जुलै रोजी दुपारी 12.23 वाजता समुद्राला उधाण येणार असून समुद्रात 4.64 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

– शहरात 9 ठिकाणी, पूर्व उपनगरात 3 तर पश्चिम उपनगरात 20 ठिकाणी झाडे पडली.
– पावसामुळे हिंदमाता, वडाळय़ातील शक्कर पंचायत रोड, धारावी क्रॉस रोड, काळाचौकीतील सरदार हॉटेल, माटुंग्यातील एसआयईएस काॉलेज, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर पुलाखाली, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सब वे आणि वांदय़ातील नॅशनल कॉलेज या सखल परिसरात पाणी साचले.
– मुंबईत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरात 81.91 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 82.69 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 88.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या