राज्यपालांनी न्यायालयाच्या मताचा आदर राखायला हवा होता! न्यायमूर्तींनी व्यक्त केली नाराजी

mumbai-highcourt

विधान परिषदेच्या नामनियुक्त 12 आमदारांची निवड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या नामनियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत राज्यपालांनी न्यायालयाचा आदर राखायला हवा होता, पण राज्यपालांनी अद्यापही नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतलेला नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज फेटाळून लावली. भाजप नेते गिरीश महाजन व जनक व्यास यांनी निवड प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मात्र ही याचिका फेटाळून लावत दोन्ही याचिका कर्त्यांनी कोर्टात भरलेली 12 लाखाची अनामत रक्कम ही जप्त करण्यात आली.