दसरा मेळावा – शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली

दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात तिन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची शिवसेनेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेच्या वतीने अस्पी चिनॉय यांनी बाजू मांडताना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्याहस्तक्षेप याचिकेविरोधात जोरदार युक्तीवाद केला होता. सदा सरवणकर यांच्या हस्तक्षेप अर्जात विसंगती आहेत. केवळ आमचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही एवढाच त्यांचा हेतू आहे. सर्वोच्च न्यायालयात खरा शिवसेना पक्ष कोणता हा विषय प्रलंबित वगैरे अर्जातील काही मुद्दे या विषयाच्या बाबतीत पूर्णपणे निरर्थक. त्याचा या कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही, असा खणखणीत युक्तीवाद शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यामुळे सदा सरवणकर यांनी केलेली याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने युक्तीवाद मान्य केल्याचे दिसत आहे.