
प्राथमिक चौकशी करण्यासाठी 14 दिवसांचे बंधन असतानाही पोलीस महिनोंमहिने चौकशी करत असतात. कायद्याचे पालन करत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कान उपटले.
न्या. अजय गडकरी व न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. भारतीय न्याय संहिता कायद्या अंतर्गत पोलिसांना 14 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा कायदा मुंबई पोलिसांना लागू होतो की नाही याचा खुलासा केंद्रीय गृह मंत्रालयाने करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे.
पोलिसांचा कारभार मनमानी
पोलीस मुदतीत प्राथमिक चौकशी करत नाहीत. कायद्याचे निर्बंध असतानाही मनमानी पद्धतीने चौकशीचा फेरा सुरू असतो, असे न्यायालयाने फटकारले.

























































