
कोटय़वधी रुपयांचा गंडा घालत पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे बोल सुनावले. फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी हवी असेल तर हिंदुस्थानात परत यावे लागेल असे फटकारत न्यायालयाने आज पुन्हा मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला तसेच हिंदुस्थानात परतण्यास तयार आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी आम्ही शेवटची संधी देत आहोत असे बजावत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी 16 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.




























































