मलिंगासह सात खेळाडूंना मुंबई इंडियन्सचा बायबाय

आयपीएलचा लिलाव येत्या 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधी आठ संघ मालकांनी संघातील कायम खेळाडू व रिलीज अर्थातच सोडून दिलेले खेळाडू अशी यादी तयार केली. मुंबई इंडियन्सकडून लसिथ मलिंगासह सात खेळाडूंना बायबाय करण्यात आले आहे. यामध्ये मिचेल मॅक्लेघन, जेम्स पॅट्टीनसन, नॅथन कुल्टर नाईल, एस रूदरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय व दिग्वीजय देखमुख यांचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्सने स्टीवन स्मिथला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संजू सॅमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला बाहेर काढले आहे. चेन्नई सुपरकिंग्सकडून हरभजन सिंग, केदार जाधव, मुरली विजय, पियूष चावला यांना रिलीज करण्यात आले आहे. सुरेश रैनाला मात्र संघात कायम ठेवण्यात आले आहे.

फ्रेंचाईजी क्रिकेटला मलिंगाचा रामराम

दरम्यान, मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर लसिथ मलिंगा याने फ्रेंचाईजी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता आयपीएलच्या मिनी ऑक्शनसाठीही उपलब्ध नसेल. भविष्यात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या