
कुर्ला स्पोर्ट्स क्लब आणि कराची हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व माजी शाखाप्रमुख भरत खवणेकर यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्याकरिता एकदिवसीय कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कुर्ला (पश्चिम) कलिना विधानसभा क्षेत्रातील 1) कराची विद्यालय, 2) शिशुविकास मंदिर, 3)गांधी बाल मंदिर, 4)मायकेल स्कूल, 5) हॉलीक्रॉस हायस्कूल, 6)अंजुमान इस्लाम, 7)शिवाजी विद्यालय या शाळांतील 200 मुलांनी सहभाग घेतला होता. प्रवीण सावंत यांनी सी.बी. एस.ई.च्या खेळाच्या अभ्यासक्रमात कबड्डीच्या समावेशासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे या प्रशिक्षण शिबिराकरिता एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभला. या मुलांना मनोहर इंदुलकर, राजेंद्र अनभवणे, मनोहर सनगरे, चारू गिलबिले, राजाराम हुमणे, शशी राऊत यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे उद्घाटन विद्यमान शिवसेना विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर समारोप मुंबई उपनगर कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष सुधाकर घाग यांच्या हस्ते करण्यात आले. तद्प्रसंगी विभाग संघटक महेश पेडणेकर, उपविभागप्रमुख राजू परब, माजी शाखाप्रमुख भरत खवणेकर, शाखाप्रमुख राजन खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.




























































