मुंबईकरांच्या परवडणाऱ्या घरांवर एक–अडीच चटई क्षेत्राचा निर्णय लादू नका!

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेच्या विकास आराखड्यात मुंबईत बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित परवडणाऱ्या घरांसाठी तीन आणि चार चटई क्षेत्राची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता एक-अडीच चटई क्षेत्र निर्देशांक मुंबईवर लादू नये अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता राज्य सरकारला पत्र देणार आहेत.

मुंबईचा 2014 ते 2034 चा विकास आराखडा मंजूर झाला असून यामध्ये ना विकास क्षेत्रातील तीन हजार हेक्टर जमिनीवर परवडणारी घरे बांधणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. यामध्ये घरांसाठी तीन ते चार चटई क्षेत्राची शिफारस करण्यात आली आहे, मात्र राज्य सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारीत जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार सर्वसामान्य ठिकाणी 2.5 एफएसआय आणि ना विकासक्षेत्र किंवा शेत जमिनीकर एक एफएसआय देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे होणारे मिळणाऱ्या वाढीव चटई क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

महासभेच्या परवानगीनंतर करणार पाठपुरावा

‘डीपी’मध्ये परकडणाऱया घरांसाठी तीन ते चार चटई क्षेत्र निर्देशांक देण्याची शिफारस केली असून यावर राज्याच्या नगरविकास विभागाच्या समितीने सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे पालिकेची शिफारस राज्य सरकारने बदलू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत पाठपुराव्यासाठी पालिका आयुक्त राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार असून याची परवानगी ते महासभेकडे मागणार आहेत. याबाबत सोमवारी होणाऱ्य़ा महासभेत निर्णय होण्याची शक्यता आहे.

परकडणाऱ्या घरांसाठी आरक्षित जमीन

ना विकास क्षेत्र – 2100 हेक्टर
पर्यटन क्षेत्र – 500 हेक्टर
मिठागरे – 260 हेक्टर
मुंबई पोर्ट ट्रस्ट – 140 हेक्टर
एकूण – 3000 हेक्टर

अशी बांधणार परकडणारी घरे

300 चौरस फुटांची तीन लाख 50 हजार

450 चौरस फुटांची तीन लाख 50 हजार

600 चौरस फुटांची तीन लाख

आपली प्रतिक्रिया द्या