महिंद्रा ऍण्ड महिंद्रा वर्कर्स युनियनने वापरलेला फंड योग्यच!

656

कांदिवली येथील महिंद्रा ऍण्ड महिंद्रा वर्कर्स युनियनने कापरलेला फंड संघटनेच्या ध्येय आणि धोरणानुसार योग्य आहे, असा निर्णय मुंबई औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा वर्कर्स युनियनचा सामाजिक संस्थाना फंड देण्याबाबतचा वाद गेली चार वर्षे प्रलंबित होता. संघटनेने फंडाच्या रूपाने केलेली मदत अयोग्य आहे, असा दावा तक्रारकर्त्याने केला होता. पण न्यायमूर्ती जीतेंद्र गांधी यांनी संबंधित अर्जाकर सुनावणी करताना युनियनने कापरलेला फंड संघटनेच्या ध्येय आणि धोरणानुसार योग्य असल्याचे सांगितले.

आधी मुंबई औद्योगिक न्यायालयाने सदर अर्जाकर सुनावणी करताना युनियनने सामाजिक मदतीच्या रूपाने केलेल्या फंडाला आक्षेप घेत ती मदत परत घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचा फेरविचार कराका असा अर्ज युनियनने केला होता. त्या दाव्यावर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन मुंबई औद्योगिक न्यायालयाने नुकताच याप्रकरणी निकाल दिला आहे. या युनियनचे नेतृत्व माजी राज्यमंत्री सचिन अहिर करीत आहेत. आर्थिक सहाय्य करण्याबाबतचा निर्णय युनियन पदाधिकाऱ्यांच्या व सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर घेण्यात आले आहेत. त्याकर मुंबई औद्योगिक न्यायालयाने मागील अर्जाचा फेरविचार करताना युनियनचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. या दाव्यातील अर्जदार कंपनीतील एक कामगार असून त्यांना युनियनने गैरवर्तवणुकीबद्दल संघटनेतून दूर केले होते. त्याविरुद्ध त्यांनी औद्योगिक न्यायालयात धाक घेतली होती. औद्योगिक न्यायालयाने त्यांची केलेली हकालपट्टी मान्य केली. युनियनच्या वतीने ऍड. विजय वैद्य यांनी बाजू मांडली. कामगारांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे, असे युनियनचे अध्यक्ष राजीव सहानी आणि सेक्रेटरी अर्जुन देवकर यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या