
मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आज आपली नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली. यानंतर महापौर निवडीच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. 11 फेब्रुवारीला महापौर पदासाठीची निवडणूक घेण्यात येणार आहे.
मुंबईच्या महापौर निवडीसंदर्भात लवकरच पालिका प्रशासनाकडून अधिसूचना काढून कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. साधारण 6 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून 11 फेब्रुवारीला मुंबईच्या नव्या महापौरांची निवड होणार असल्याची चर्चा आहे.



























































