टपाल खात्यात मेगा भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टपाल खात्यात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात खरे उतरणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये पोस्ट कार्यालयात विविध पदांसाठी 3650 जागा रिक्त असून या जागांवर मेगा भरती सुरू आहे. त्यासाठी तरुणांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, नगर, ठाणे व अन्य ठिकाणांसाठी ही भरती आहे. ऑनलाईन भरती प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार पोस्टाच्या वेबसाईटवर अर्ज करू शकणार आहेत.

पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर, पोस्टमन या पदांसाठी ही भरती आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष एवढी आहे. तसेच उमेदवार दहावी परिक्षा उतीर्ण झालेला असावा. त्याला इंग्रजी आणि गणित या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांच्या ऑनलाईन अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. SC/ST/PWD वर्गातील उमेदवारांसाठी हे अर्ज मोफत आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मेरिटनुसार म्हणजेच क्षमतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.