‘हजेरी अ‍ॅप’मुळे मुंबई मेट्रोची अडीच कोटींची बचत

मुंबई मेट्रोचे ‘हजेरी अ‍ॅप’ कर्मचाऱ्यानेच तयार केल्यामुळे प्राधिकरणाची अडीच कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याबद्दल शिवसेना शाखा क्रमांक 204 च्या वतीने परळगाव येथील रहिवासी आणि मेट्रोचे कर्मचारी समीप परब यांचे कौतुक केले.

महामुंबई मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोचे कर्मचारी समीप परब यांनी ‘हजेरी अ‍ॅप’ तयार केले असून हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यांनी हे अ‍ॅप बनविल्यामुळे मुंबई मेट्रोची वार्षिक अडीच कोटींची बचत झाली आहे. नुकतेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी हे अ‍ॅप स्वीकारून समीप परब यांचे कौतुक केले. शिवसेना शाखा क्रमांक 204 च्या वतीने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी समीप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. उपशाखाप्रमुख प्रकाश सुर्वे, गटप्रमुख नेताजी केसरकर, विलास सुर्वे, रोहित सुर्वे यावेळी उपस्थित होते.