अग्निशमन दलाकडून 626 हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंटची झाडाझडती; 12 ठिकाणी सिलिंडर जप्त, तीन जणांना नोटीस

मुंबईत वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून तब्बल 626 ठिकाणी हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट, बार, लॉज आणि आस्थापनांना भेटी देऊन अग्निसुरक्षेबाबत तपासणी करण्यात आली. यामध्ये 12 ठिकाणी बेकायदेशीर सिलिंडर जप्त करण्यात आले असून अग्निशमन यंत्रणा तैनात नसल्यामुळे तीन जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत नववर्ष सागतासाठी अनेक ठिकाणी पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते. मात्र गेल्या वर्षातील अनुभव पाहता दुर्घटना घडल्यानंतर संबंधित ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसणे, बेकायदेशीर सिलिंडर असणे असे प्रकार घडल्याचे समोर येते. अशा बेजबाबदार प्रकारांमुळे काही वेळा नाहक जीवित-वित्तहानी झाल्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन दलाकडून नियमितप्रमाणे सर्व आस्थापना, हॉटेल्सची पाहणीही करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली.

अशी झाली कार्यवाही

  • थ्री-फाईव्ह स्टार हॉटेलची तपासणी 21
  • लॉजिंग हाऊसची तपासणी 79
  • रूफटॉफ हॉटेलची तपासणी 9
  • ऑर्पेस्ट्रा, बार यांची तपासणी 50
  • मॉल्सची तपासणी 19
  • हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी 466