गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधणार, स्थलांतरितांना गावी घरे

राज्य सरकारच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घरे देता येतील का याबाबत तपासणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या 1 लाख घरांच्या संदर्भात गिरणी कामगार युनियनसोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत दिले.