
दुबईत जास्त पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सिराज इद्रीस चौधरी असे अटक आरोपीचे नाव आहे. चौधरीवर याआधीही गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीने वाशी येथील पीडित महिलेला दुबईत जास्त पगाराची नोकरी मिळवून देतो सांगत जाळ्यात ओढले. यानंतर नोकरीचे आमिष दाखवत त्याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अखेर महिलेने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नोकरीचे आमिष दाखवत जानेवारी ते मार्च दरम्यान वारंवार बलात्कार केला.
महिलेच्या फिर्यादीनंतर वाशी पोलिसांनी आरोपी चौधरीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.