अटल सेतूवर कार उभी करून एका तरुणाने समुद्रात उडी घेतल्याची घटना सोमवारी घडली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता तरुणाचा सध्या शोध सुरु आहे. शिवडी पोलीस तरुणाच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी हा तरुण अटल सेतूवर लाल रंगाची ब्रेझा कार घेऊन आला. त्यानंतर त्याने पुलावर साईडला कार उभी केली आणि समुद्रात उडी घेतली.
शिवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी अटल सेतूवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.