
अॅप्सवरून फसवणूक करणाऱ्यांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. आशमीन मलिक, परी उपाध्याय, निहारिका कौर, मोहसीन खान, मयंक कस्तुरीया, मयूर डिडोळे, जतीन कुमार, फैजल अली, दीपक दास, साहिल कुशवाह अशी त्यांची नावे आहेत.
एका अॅप्सच्या माध्यमातून पुरुषांना हॉटेलमध्ये बोलावून फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर याच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक साकीनाका येथील एका ठिकाणी गेले. घडल्या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच दहा जणांना पोलिसांनी अटक केली.



























































