
मुंबईतील पाच अधिकाऱयांसह ठाणे व छत्रपती संभाजी नगरातील प्रत्येकी एक अशा सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आज सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली. अधिकाऱयांच्या बढतीचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले.
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळालेल्या अधिकाऱयांमध्ये वरिष्ठ निरीक्षक अजय जोशी, नीलेश बागूल, गबाजी चिमटे, संजीव धुमाळ, बळवंत देशमुख, राजकुमार वाघचवरे आणि शैलेश संखे यांचा समावेश आहे. अधिकाऱयांच्या बढतीनंतर मुंबईतील मरीन ड्राइव्ह, खार, विलोपार्ले आणि मुलुंड ही पाच पोलीस ठाणी रिक्त होणार आहेत.
























































