सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले योजनेसाठी 50 टक्के रक्कम मिळणार, शिवसेनेच्या मागणीला यश

राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांना आता 50 टक्के निधी मिळणार आहे. सध्या सरकारी रुग्णालयांना या योजनेतून केवळ 12 टक्के निधी मिळतो. रुग्णांना दिलासा देण्यासाठी सरकारने तामीळनाडू पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी विधान परिषदेत संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. दरम्यान, गरीब रुग्णांवर वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी ‘महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना’ वरदान ठरली असून या योजनेच्या निधीत वाढ केली जावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी चालू अधिवेशनात केली होती.