
दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नागरिकांना दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य आणि सुगंधी उटण्याचे वाटप ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
शिवसेना वर्सोवा विधानसभा शाखा क्र 59 व 60च्या वतीने अंधेरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दीपावली स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब, आमदार हारुन खान, उपनेते अमोल कीर्तिकर, उपविभागप्रमुख राजेश शेटये, महिला विभाग संघटक अनिता बागवे, मेघना माने, शैलेश फणसे, आग्नेस फर्नांडिस, विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर, शीतल सावंत, उपविभागप्रमुख नयन आजगावकर, जागृती भानजी, माधुरी धनावडे, जयश्री मोरे, सतीश परब, सिद्धेश चाचे, दयानंद सावंत, प्रकाश खोत, बेबी पाटील, अश्विनी खानविलकर, सुचिता सावंत, सुप्रिया चव्हाण, संजना हरळीकर, नीलेश देवकर, सचिन आंबेकर उपस्थित होते.
वर्ल्ड वाईड ह्यूमन राइट्स ए. एफ. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र अध्यक्ष मोहन वायदंडे यांच्या नियोजनानुसार ज्येष्ठ नागरिकांना फराळ वाटप करण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत परळ येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, दिलीप शिंदे, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, साऊथ मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे, डब्लूएचआरएएफचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वाणी, महाराष्ट्र सचिव ज्योती भोसले, मुंबई सरचिटणीस प्रमिला अडसूळ, आदिराज लोकेगावकर, शेखर छत्रे व इतर उपस्थित होते.