Mega Block – हार्बर रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द

वाशी रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणालीच्या कामासाठी हार्बर मार्गावर बुधवार 6 ऑगस्टपासून 8 ऑगस्टपासून रात्रकालीमन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रात्री 10.45 ते पहाटे 3.45 दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉकमुळे रात्री उशिराने सुटणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकल विलंबाने धावतील.

6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान अंशतः रद्द लोकल

रात्री 8.54 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशी स्थानकात रद्द
रात्री 9.16 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकात रद्द
रात्री 10.00 वाजता सुटणारी वांद्रे-सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकात रद्द
रात्री 10.50 आणि 11.32 वाजता सुटणारी पनवेल-वाशी लोकल नेरुळ स्थानकात रद्द

7 आणि 8 ऑगस्ट रोजी पहाटे 5.10 वाजता सुटणारी सीएसएमटी-गोरेगाव लोकल वडाळा येथून सुटेल. तर 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान सीएसएमटीहून रात्री 9.50, 10.14 आणि 10.30 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी-वाशी लोकल तसेच पहाटे 04.03 आणि 4.25 वाजता सुटणाऱ्या वाशी-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.