
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील गर्दीचा ताण नजीकच्या काळात कमी होणार आहे. कांदिवली-बोरिवली स्थानकांदरम्यान सुरू असलेले सहाव्या मार्गिकेचे काम जानेवारीच्या मध्यावर पूर्ण होईल. त्यानंतर चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान 22 अतिरिक्त लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे ‘पिक अवर्स’ला खचाखच भरून येणाऱ्या विरार-चर्चगेट लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाया प्रवासी संख्येच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या वाक्रमप्राप्त आहे. त्यात अतिरिक्त मार्गिकेच्या अभावाचा अडसर येत होता. त्याच अनुषंगाने पश्चिम रेल्वेने सध्या कांदिवली व बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
लोकलच्या मार्गातील मेल-एक्स्प्रेसचा अडसर दूर होणार
लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात सध्या मेल-एक्स्प्रेसचा अडसर येत आहे. बोरिवलीदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे जानेवारीच्या मध्यावर पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर मार्गिकेची फिटनेस तपासणी आणि इतर आवश्यक कामे केली जातील. संपूर्ण कामे पूर्ण होऊन सहावी मार्गिका खुली केल्यानंतर वांद्रे टर्मिनस ते बोरिवली यादरम्यान लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा स्वतंत्रपणे धावतील. त्यामुळे लोकल सेवेचा वक्तशीरपणाही सुधारेल, असा दावा पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.


























































