Breaking – मुंबईतील दारूची दुकानं बंद, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचा आदेश

3073

मुंबईत सुरू झालेली दारूची दुकाने उद्या 6 मे पासून पुन्हा बंद होणार आहेत. दारू दुकाने आणि कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या विभागात पाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यानंतर गेले दोन दिवस होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना प्रसाराचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने 4 मे पासून लाॅकडाऊन कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथीलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते, असे आयुक्तांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, उद्या 6 मेपासून मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या परिपत्रकानुसार आता केवळ किराणा माल मिळणारी, अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. यामध्ये पाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगीही रद्द करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या