मुंबईचं प्रसिद्ध NSCI Dome बनलं क्वारंटाइन सेंटर

873

वरळी परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेच्या वतीने NSCI DOME,वरळी येथे 500 कोरोना संशयितांना Quarantine करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी गुरुवारी या सर्व व्यवस्थेची महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून आढावा घेतला. या वेळी त्यांनी ‘माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे. मुंबईतून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या संयमाची आणि सहकार्याची गरज आहे. कृपया घरी रहा, पोलिस व प्रशासनाला योग्य सहकार्य करा’, अशी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या