मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटली

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे पाच रुग्ण सापडले. त्यापैकी एका रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभरात 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरीही मुंबईत सध्या 68 सक्रिय रुग्ण आहेत तर 57 रुग्णांचे वैद्यकीय अहवाल येणे अजून बाकी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.