मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगिती

630

दोन दिवसांपूर्वी ज्या दहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्या बदली आदेशाला आज स्थगिती देत या अधिकार्‍यांना पुन्हा त्यांच्या आधीच्या ठिकाणी हजर होण्याचा नवीन आदेश पोलिस आयुक्तालयातून काढण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाने नगर्णय घेऊन दहा उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी नवीन ठिकाणचा चार्ज देखील घेतला. मात्र पोलीस आयुक्तालयातून आज नवीन आदेश जारी करत त्या बदली आदेशाला स्थगिती देउन अधिकार्‍यांना पुन्हा आधीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्यास सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यालय 1 च्या उपायुक्त एन. अंबिका यांच्याकडे परिमंडळ 3 चा तर अभियानचे उपायुक्त प्रणय अशोक यांच्याकडे परिमंडळ 5 चा तात्पुरता चार्ज सोपविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या