पवई आयआयटीचा ‘बोधीट्री’ ऑनलाईन शिकवणीसाठी आता सर्वांना उपलब्ध

कोरोना लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिकवणीशिवाय पर्याय उरला नाही. परंतु त्यासाठी मोजकेच पर्याय उपलब्ध होते. पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी त्यात ‘बोधीट्री’ या नव्या पर्यायाची भर घातली आहे. या बोधीट्रीचा वापर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांना विनामुल्य करता येणार आहे. तो सहज इन्स्टॉल करता येऊ शकतो.

‘बोधीट्री’ हा एक ऑनलाईन मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म आहे. एकप्रकारे आपण वर्गामध्येच शिकवतोय असा फील त्यातून मिळतो. शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच तो डिझाईन केला गेला आहे. त्यावर पुस्तकेही उपलब्ध आहेत. त्याशिवाय व्हिडियो, सराव पेपर आणि प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱया पृतीही उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. त्यांची परीक्षाही घेऊ शकतात आणि गुणपत्रिकाही देऊ शकतात.‘बोधीट्री’ हा विशेषकरून व्हर्च्युअल लॅब आणि सॉफ्टवेअर लॅब असलेल्या इंजिनियरींग महाविद्यालयांसाठी अधिक फायदेशीर आहे. सध्या या प्लॅटफॉर्मचा वापर सोलापूर आणि गोव्यातील महाविद्यालयांमध्ये केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या