श्री सिद्धिविनायक मंदिरात आता आयत्या वेळी क्यूआर कोड नाही, 1 मार्चपासून आगाऊ बुकिंगनेच दर्शन

मुंबईसह राज्याच्या काही जिह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर 1 मार्चपासून आगाऊ ऑनलाइन बुकिंगनेच प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. आगाऊ बुकिंगशिवाय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आयत्यावेळी क्यूआर कोड देऊन मंदिरात प्रवेश दिला जात होता, पण यापुढे ही पद्धत बंद केली जाणार आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता तासाला केवळ 100 भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार असून आगाऊ बुकिंग करूनच श्रींचे दर्शन घेता येईल, असे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका छापवाले यांनी स्पष्ट केले. तसेच दर्शनाची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असल्याचेही त्या म्हणाल्या.

– 2 मार्च रोजी अंगारकी संकष्टीनिमित्त श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाची वेळ सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या