‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1190 च्या मध्ये प्रदर्शित म्युझिकल ब्लॉकबास्टर ‘आशिकी’ चित्रपटातून स्टार झालेल्या अभिनेता राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 52 वर्षीय राहुल रॉय कारगिल येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यांची तब्येत अचानक बिघडून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने त्यांच्यावर नानावटीच्या आयसीयूत उपचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे.

पीटीआयच्या वृत्तानूसार रॉय कारगिलहून परतल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. त्यांना बरे होण्यास काही वेळ लागेल असेही त्यांनी सांगितले. राहुल रॉय दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आशिकी चित्रपटातून एका रात्रीत स्टार पद मिळविले. त्यांनी नक्वदच्या दशकात जुनून आणि फिर तेरी कहानी याद आयीसारखे चित्रपट केले. बिग बॉसचा पहिला सिझन 2006 साली ते जिंकले होत. अनेक वर्षांनी पुन्हा ते चित्रपटाकडे वळले असून त्यांच्या ‘एलएसी-लाईव्ह इन द बॅटल’ या चित्रपटाचे कारगिल येथे चित्रीकरण सुरू आहे.