Mumbai Rain – शीव-पनवेल महामार्गावर एसटीचा अपघात, चालकाच नियंत्रण सुटलं आणि बस थेट…

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांसह सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच शीव-पनवेल महामार्गावर खारघरमध्ये चालकाच एसटीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही.

शीव-पनवेल महामार्गावर खारघरमधील हिरानंदानी उड्डानपुलावर बसचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला जाऊन आदळली. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. घटनेचा माहिती मिळताच संबंधित अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Free Press Journal ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.