रानू बदलली, चाहत्यानंतर मीडियासमोर दाखवला अॅटीट्यूड

4035

सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार सिंगर बनलेल्या रानू मंडलच्या डोक्यात हवा गेली आहे. अनपेक्षितपणे अल्पावधीतच पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्याने रानूचा स्वभावच बदलला आहे. काही दिवसांपू्र्वी एका चाहतीने अंगाला हात लावल्याने रानू भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रानू मीडियावाल्यांना अॅटीट्यूड दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमुळे रानू पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. तिच्यातला हा बदल अनेकांना खटकत असून तिने आपले जुने दिवस विसरु नयेत असे सांगत यूजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओमध्ये एक पत्रकार रानूला तिच्या स्वप्नाबद्दल विचारत आहे. पण रानू तिला चक्क टाळत असल्याचं दिसतं आहे. ऐकायला येत नाही अस सांगत तिने पत्रकारांना टाळण्यासाठी तोंडात काहीतरी टाकल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.

रानूचा रेल्वे स्टेशनवर गातानाच व्हिडीओ एका तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर एका रात्रीत रानू घराघरात पोहचली. गायक हिमेश रेशमिया याने रानूला चित्रपटात गाण्याची संधीही दिली. रानू ज्या परिस्थितीतून आली होती ते बघून अनेकजण हळहळले तिच्याप्रती लोकांनी आदर व्यक्त करत तिला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर रानूचं गाणेही हीट झाले आणि रानू एका रात्रीत बॉलीवूड सिंगर बनली. पण त्यानंतर मात्र रानू बदलली. एका स्टोअरमध्ये ती गेली होती. त्यावेळी तिला बघून एक चाहती इतकी उत्साहीत झाली की तिने रानूला स्पर्श केला. हे बघताच रानू संतापली व तिने त्या चाहतीला जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. रानूचे हे बदललेले रुप बघून चाहते संतापले व त्यांनी तिला ट्रोल केले.त्यानंतर तसाच अॅटीट्यूड तिने आता पत्रकारानांही दाखवल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या