मुंबईला रेड अलर्ट; आज शाळा-कॉलेज बंद

मुंबईत गेले आज दमदार एंट्री करीत शहरासह दोन्ही उपनगरांना झोडपून काढले. तर उद्या गुरुवार, 27 जुलै रोजीदेखील मुंबईत अतिजोरदार पाऊस होणार असून ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. शिवाय हवामान खात्याकडून रेड अलर्टही देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व कॉलेज व शाळांना उद्या गुरुवार, 27 जुलैला सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, सर्वांनी सतर्क रहावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.