प्रजासत्ताकदिनी इन्फिनिटी मॉलमध्ये रंगणार राष्ट्रीय क्यूब अजिंक्यपद स्पर्धा

281

मोबाईल आणि व्हिडीओ गेममध्ये रंगून आपला बहुतांश वेळ वाया घालवणाऱया मुलांसाठी मनोरंजक आणि बुद्धी वाढवणारा खेळ ‘मेगा इव्हेंट क्राऊन किडस्’ मुंबईत मेगा स्पर्धेद्वारे आणण्याचा निर्धार पूर्ण करणार आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी रविवार, 26 जानेवारीला मालाडच्या इन्फिनिटी मॉल येथे नॅशनल क्यूब अजिंक्यपद स्पर्धेची पहिली आवृत्ती पार पडणार आहे. त्यात एक हजाराहून अधिक मुले स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. हा मेगा इव्हेंट क्राऊन किडद्वारे सुकूपीडिया बिझिनेस सर्व्हिसेसच्या अनिशा देठे यांनी आयोजित केला आहे आणि आयसीए (इंडियन क्यूब असोसिएशन) ने त्याला मान्यता दिली आहे.

मी विविध प्रकारचे क्यूब आपल्या केबिनमध्ये ठेवतो आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे मोकळा क्षण असेल किंवा निर्णय घेण्याची मी वाट पाहतो तेव्हा मी माझ्या फोनवर जाण्याऐवजी क्यूबसोबत खेळतो.या खेळाची गोडी लावून विद्यार्थ्यांना मोबाईल आणि व्हिडीओ गेममधून बाहेर काढण्याचा आणि त्यांची बुद्धिमत्ता अधिक वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी विनाशुल्क किंवा रास्त दराने क्यूब ऑफर करणारे तज्ञ पुरवतो. त्यांच्यासह शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम अगदी सहजतेने पूर्ण करणे शक्य होईल.

आमचे मुख्य लक्ष वेग, हिंमत किंवा येणाऱया इतर अडचणी सोडवण्यासाठीची बुद्धिमत्ता वाढवण्याचे आहे, असा विश्वास ‘आयसीए’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी युसेबियस
नोरोन्हा यांनी व्यक्त केला.

येत्या चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर लेव्हल (4 ते12 वर्षे) आणि ज्येष्ठ पातळी (13 ते 18 वर्षे) अशा दोन वयोगटांतील मुलांना सहभागी होता येईल. मुलांनी सर्वोत्तम रुबिक्स क्यूब जंकीजच्या काही प्रदर्शनावर न्यूरोमस्क्युलर जंक्शनचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन युसेबियस यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या