गुरुवे नम: शिवसेनाप्रमुखांना शिवसैनिकांची गुरुवंदना!

541

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचा आधारस्तंभ. मराठी माणसाला स्फूर्ती देणारा धगधगत्या विचारांचा जिवंत झरा. शिवसेनाप्रमुख आजही प्रत्येकाच्या मनामनात आहेत. शिवसैनिक त्यांना गुरुस्थानी मानतात. रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिनी असंख्य शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या साहेबांना सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून गुरुवंदना दिली. त्यांच्या चरणी त्रिवार अभिवादन केले.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांचे आशीर्काद घेण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी असंख्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींची रिघ लागते. शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्काणानंतरही शिवसैनिक ‘मातोश्री’ येथील त्यांच्या आसनावर फुले अर्पण करून नतमस्तक होतात. यावर्षी कोरोना संकटामुळे शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ येथे येऊ नये, घरी राहूनच गुरुपौर्णिमा साजरी करावी असे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसैनिकांनी आपल्या घरी तसेच शिवसेना शाखांमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून त्यांना गुरुवंदना दिली. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळीही निवडक शिवसैनिकांनी जाऊन साहेबांच्या तसबिरीला चाफ्याचा हार अर्पण केला. त्याचप्रमाणे फेसबुक, ट्किटरसारख्या माध्यमांवर शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे पोस्ट करून त्यांना अभिवादन केले गेले. लाखो शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींच्या व्हाॅट्सऍपवरील डीपीही रविवारी शिवसेनाप्रमुखांचा होता.

आपली प्रतिक्रिया द्या