शिवभोजनाच्या ताटातील घास गोड झाला! जेवण आवडलं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली विचारपूस

4007

काय ताई, काय दादा, जेवायला सुरुवात केली का, जेवणाबाबत समाधानी आहात ना, जेवण ठीक आहे का, चव व्यवस्थित आहे ना, जेवण आवडलं की नाही… अशा आपुलकीने कुटुंबप्रमुखाने विचारपूस करावी आणि ताटातला घास गोड व्हावा असाच अनुभव महाराष्ट्रातील जनतेने आज घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वत: शिवभोजन वेंâद्रात जेवणासाठी आलेल्या जनतेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपुलकीने विचारपूस तर केलीच, शिवाय या थाळीबाबत काय सूचना असतील तर अवश्य सांगा, असे आवाहनही केले.

प्रजासत्ताकदिनी ‘शिवभोजन’ योजनेचा राज्यात शुभारंभ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि नंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या जनतेशी संवाद साधला. शिवभोजनाचा आस्वाद घेणाऱ्याजनतेला समोर लावलेल्या एलईडीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले. नुसते दिसलेच नाहीत, तर त्यांनी थेट जेवण कसं वाटलं, असं विचारलंसुद्धा. हा या सर्वसामान्य जनतेसाठी एक सुखद अनुभव होता. हमालांसारख्या श्रमिकांपासून ते ऑफिसात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या शिवभोजन उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांची आभार मानले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आता दहा रुपयांत जेवण होतेय

नंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री संवाद साधताहेत पाहून त्यांचे आभार मानले. साहेब, एरवी जेवायला ५० रुपये लागायचे. आता दहा रुपयांत जेवण होतेय… तुम्ही शिवभोजन थाळी सुरू करून आमच्यासाठी खूप चांगली सोय केली बघा, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले. वेंâद्रातील सुविधा आणि येणारा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतला. सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर दुपारची जेवणाची चांगली सोय झाल्याचेही कोल्हापूरकरांनी सांगितले.

योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल – छगन भुजबळ

शिवभोजन योजनेतील थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून याची मागणी खूप मोठी आहे. त्यामुळे भविष्यात योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. गोरगरीब जनतेला याचा खूप लाभ होत असल्याचे सांगताना त्यांनी केंद्रचालक अतिशय आस्थेने आलेल्या प्रत्येकाला जेवण देत असल्याची माहिती दिली. दुपारी १२ वाजताच शिवभोजन केंद्रावर जेवणासाठी रांग लागते, एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली. शिवभोजन अॅपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातील योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठी कटिबद्ध – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या कल्पनेतील शिवभोजन योजनेचा स्वीकार सहभागी दोन्ही पक्षांनी केला, योजनेचे स्वागत केले त्याचे समाधान आहे. सरकारला आजच म्हणजे २८ तारखेला सत्तेत येऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या अल्पकाळात सर्वसामान्य जनतेसाठी केलेला हा संकल्प केवळ संकल्प न राहता प्रत्यक्षात आल्याचा आनंद आहे, सरकार सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कटिबद्ध आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.

दररोज एक लाख थाळी शिवभोजन वाटप करणार

प्रजासत्ताकदिनी राज्यातील 36 जिल्ह्यांत 50 केंद्रांत शिवभोजन योजनेचा दणक्यात शुभारंभ झाला. पहिल्या दोन दिवसांत या वेंâद्रातून २५ हजार लाभाथ्र्यांनी थाळीचा आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी 11 हजार 400 थाळी गेल्या, तर दुसNया दिवशी 13 हजार 500 हून अधिक थाळी शिवभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. सध्या 50 केंद्रांवरून 18 हजार थाळी देण्यात असून ही योजना 500 केंद्रांपर्यंत वाढवून दररोज एक लाख थाळी देण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.

हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था झाली

साहेब, हा शासनाचा खूप अभिनव उपक्रम आहे. तुमची कल्पना खूप छान आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, आतापर्यंत दररोज 150 थाळ्या गेल्या, या शब्दांत राजश्री सोलापुरे यांनी यावेळी आपला आनंद व्यक्त केला. केंद्रात 72 लोकांना जेवणास बसण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली. हॉस्पिटलच्या आवारात हे केंद्र सुरू झाल्याने गोरगरीब जनतेला या थाळीचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात

मुख्यमंत्र्यांनी रुद्राक्षी स्वयं महिला बचत गटाच्या अण्णा रेस्टॉरंटच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशी तसेच त्यांनी सुरू केलेल्या शिवभोजन वेंâद्रात आलेल्या लोकांशी संवाद साधला. ही फक्त जेवणाची थाळी नाही; तर सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करीत आहात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी ‘अन्नदाता सुखी भव’ ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे शिवभोजन योजनेत जेवण देताना स्वच्छता, टापटीपपणा, जेवणाचा दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी वेंâद्रचालकांना दिल्या. शिवभोजन योजनेतील केंद्रचालकांची एक बैठक मुंबईत आयोजित करण्याची सूचना त्यांनी विभागाच्या सचिवांना केली.

सरकारचे वजन वाढले पाहिजे!

रुद्राक्षी स्वयं महिला बचत गटाच्या अण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देताच, पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचं वजन वाढलं पाहिजे, अशा पद्धतीने काम करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच हंशा उसळला.

आपली प्रतिक्रिया द्या