मुंबई विभाग क्र. 9 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 9 मधील महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

निरीक्षकपदी सुमित्रा नेमाडे (अणुशक्तीनगर विधानसभा), शारदा धनवट (अणुशक्तीनगर विधानसभा), रिता वाघ (शीव-कोळीवाडा विधानसभा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा संघटकपदी वत्सला पाटील (शाखा क्र. 142, 143, 145), नीलम डोळस (शाखा क्र. 144, 146) यांची तर उपविभाग संघटकपदी मदिना खान (शाखा क्र. 144, 145) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा समन्वयकपदी संगीता तेटमे (शाखा क्र. 142, 143), पुष्पा थवई (शाखा क्र. 144, 145), रेणुका टोपकर (शाखा क्र. 146, 147, 148), अनिता महाडिक (शाखा क्र. 150, 153) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मीरा-भाईंदरमधील पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे (मीरा-भाईंदर) जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हा सचिव ः राजेश सिंह सोमवंशी (मीरा-भाईंदर); उपशहरप्रमुख ः प्रेम कुमार पांडेय (प्र. क्र. 12), तानाजी कलमकर (प्र. क्र. 4), प्रवीण शुक्ला (प्र. क्र. 3), संग्राम सिंह (प्र. क्र. 13), हरीप्रसाद पाठक (प्र. क्र. 3), ओमप्रकाश सिंह (प्र. क्र. 13); सचिव ः राम सबर यादव (प्र. क्र. 12); उपविभागप्रमुख ः सुशील पवार (प्र. क्र. 18), विकेश कुमार सिंह (प्र. क्र. 12), दीपक कनोजिया (प्र. क्र. 12), लालजी यादव (प्र. क्र. 19), अनिल सिंह (प्र. क्र. 12); शाखाप्रमुख ः संदेश रहाटे (प्र. क्र. 13).