महायुतीला 42 पेक्षा अधिक जागा मिळतील – प्रकाश जावडेकर

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी.

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशातील जनतेचा मूड लक्षात घेता भाजपला देशात 300 पेक्षाही जास्त जागा तर राज्यात शिवसेना–भाजप महायुतीला 42 पेक्षाही जागा जास्त मिळतील असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केला.

महाराष्ट्रात 42 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू त्यात बारामती व नांदेडचाही समावेश असेल, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याने निराश झालेल्या राहुल गांधी यांनी खोटारडा प्रचार सुरू केला, पण न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांना अखेर माफी मागावी लागली असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या