सामाजिक उपक्रमांतून शिवसेनेचा जनतेला दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी काही ठिकाणी रक्तदान शिबीर, पूरग्रस्तांसाठी वस्तू, अन्नधान्य, कापडी पिशव्या तसेच छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केईएम रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेविका सिंधू मसुरकर आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ, नगरसेविका उर्मिला पांचाळ, श्रद्धा जाधव, डॉ. प्रवीण बांगर, प्रतिमा नाईक, डॉ. शर्मा यांच्या हस्ते रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्णनगर हॉल येथे शिवसेना शाखा क्र. 11 च्यावतीने विभागातील दिव्यांग, चर्मकार, घरकाम करणार्या महिला, गवंडी यांना मोफत धान्य, छत्री आणि कापडी पिशव्या यांचे वाटप महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळा उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, मनीषा सावंत, उपविभागप्रमुख सुनील डहाळे, महिला शाखा संघटक सोनाली विचारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख सुबोध माने यांनी केले होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून राज्यभरात प्रेरणा पंधरवडा राबवण्यात येत आहे. 15 ते 31 जुलैपर्यंत राज्यभरात 10 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत गोरेगाव, उन्नतनगर, म्युनिसिपल शाळा येथे समन्वयक शबाना ठाकूर, कुर्ला येथे शा. कृ. पंत वालावलकर माध्यमिक शाळा आणि स्वामी विवेकानंद हायस्कूल, मुंबई विभाग अध्यक्ष नरेंद्र शिंदे यांच्या हस्ते ज. मो. अभ्यंकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या