मैं…और मेरी आवाज! मुंबईत बुधवारी रंगणार कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या स्पर्धेच्या युगात आवाजाला अनन्य महत्त्व आहे. अर्थात आवाज ही परमेश्वराची देण असली तरी तो टिकवून ठेवण्यासाठी काळजी घेणं हे तितपंच गरजेचं आहे. हीच गरज ओळखून ‘मैं… और मेरी आवाज! आवाज की देखभाल’ या अनोख्या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई आकाशवाणीच्या चर्चगेट येथील सभागृहात येत्या बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत होणाऱया या कार्यशाळेचे आयोजन विविध भारती राष्ट्रीय चॅनेलच्या सृजन भारती आणि पुण्यातील गायत्री व्हाइस क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आहे.

प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार आनंदजी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. स्वरतज्ञ प्रा. डॉ. मिलिंद भोई हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. स्वर साधनेत उपयुक्त ठरणाऱया आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रदर्शनही या कार्यशाळेत पाहता येईल. या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विविध भारतीचे सहाय्यक संचालक डॉ. संतोष जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्प – डॉ. सुरेंद्र तिवारी- 7350977812.