सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरगुंडी

मुंबई शेअर बाजारात सलग आठव्या दिवशीही घसरगुंडी पाहायला मिळाली. दुपारी दोन वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये सुमारे 600 अंकांची तर निफ्टी 50 मध्ये सुमारे 250 अंकांची घसरण झाली होती. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स काही प्रमाणात सावरल्याचे पाहायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह सर्व देशांवर ‘परस्पर कर’ कर लादण्याच्या त्यांच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. त्यांच्या या भूमिकेने आज संपूर्ण जागतिक बाजारपेठेचे वातावरण बिघडवले. विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून आपला पैसा काढून घेतल्याने शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 19,077 कोटी रुपये काढले आहेत. हिंदुस्थानी रुपया अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत कमकुवत झाल्याचा फटकासुद्धा शेअर बाजाराला बसत आहे.