रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय, मुंबई सबर्बन निवडणुकीत एकता पॅनलचा झेंडा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल कामगार सेनेचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबई विभागांतर्गत उपनगरीय लोकल सेवांसाठी लोको व ट्राफिक रनिंग स्टाफच्या डिटेल बुक निर्मितीसाठी स्थापन होणाऱया कमिटीसाठी मोटरमन व ट्रेन मॅनेजर प्रतिनिधींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत रेल कामगार सेनेने ‘सीआरएमएस’सोबत स्थापन केलेल्या ‘एकता पॅनल’चे सर्व सहा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या आदेशावरून सरचिटणीस व शिवसेना उपनेते दिवाकर देव (बाबी) आणि कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात आली. एकता पॅनलने ‘एनआरएमयू’ संघटनेच्या पॅनेलचा दारुण पराभव केला. रेल कामगार सेनेचे अभ्यासू नेतृत्व असलेले मोटरमन अभय वर्तक यांनी तब्बल 75 टक्क्यांहून अधिक मते मिळवत विक्रमी विजय मिळवला. त्यांच्यासह मतलुब सिद्दीकी, सुरजितसिंग राठोर, पवन कुमार सिंग, विक्रम जोशी, रणधीर कुमार सिंग हे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. पॅनेलच्या दणदणीत विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विजयी सभा पार पडली.

विजयामागे पूर्व कमिटी सदस्य नरेंद्र तळेकर, मनोहर महाले, सहकार्याध्यक्ष योगेश जाधव, सबर्बन प्रमुख अमोघ निमसुडकर, रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर, ट्राफिक ब्रांच सचिव संतोष देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय सचिव तुकाराम कोरडे यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन निर्णायक ठरले. तसेच शैलेश प्रधान, विकास पाटील, शैलेश कांबळे, जयंत निमगळे, युवराज चोपडे, महेंद्र म्हात्रे, सूरज निकाळजे, दीपक लाड, अशोक पी., एम. डी. पाटील, मनीष गावडे, सचिन जोशी, अनिल भोईर, दादा अटकले, अजय कुमार, सुशांत पैठणकर, पी. ए. राज, सुनील जगदाळे, सतीश देसाई, प्रवीण शर्मा, राकेश महतो तसेच रेल कामगार सेनेच्या अनेक पदाधिकाऱयांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे ‘एकता पॅनेल’ला ऐतिहासिक विजय मिळवणे शक्य झाले.