
सामना ऑनलाईन । ठाणे
मुंबई-ठाणे मेट्रोसाठी वाघबीळ गावाशेजारी उभारण्यात येणाऱया कास्टिंग यार्डच्या कामाला आज स्थानिकांनी ब्रेक लावला. कास्टिंग यार्डचे काम सुरू करताना येथील स्थानिकांना नोकरीधंद्यात सामावून घेण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनी रिलायन्सने दिले होते. मात्र काम सुरू होऊन दोन महिने लोटले तरी येथील तरुणांच्या हाताला काम न दिल्याने संतप्त स्थानिकांनी धडक देत कास्टिंग यार्डचे काम बंद पाडले. स्थानिकांना कास्टिंग यार्डच्या कामात जोपर्यंत सामावून घेत नाही तोपर्यंत एक वीटही पुढे सरकू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
ठाणेकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचे शहरात काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी हिरानंदानी इस्टेट येथे वाघबीळ गावाशेजारील खाडीकिनारी एमएमआरडीएच्या माध्यमातून रिलायन्स कंपनीला मिळालेल्या ठेक्याद्वारे मेट्रो कास्टिंग यार्डचे काम सुरू आहे. येथील ग्रामस्थांच्या जमिनी बळजबरीने रिलायन्स कंपनीने ताब्यात घेतल्याने शेतकऱयांनी त्याला विरोध केला होता. विकासकामात खोडा नको म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा या कास्टिंग यार्डसाठी वापरण्यात येतील त्यांना मेट्रोचे काम संपल्यानंतर त्या परत करण्यात येतील. मोबदल्यासह त्या परिसरातील भूमिपुत्रांना या कामामध्ये सहभागी करून त्यांच्या योग्यतेनुसार बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, रेडीमिक्सर, माथाडी काम तसेच इतर कामांमध्ये नोकऱया देण्यात येईल असे रिलायन्स कंपनीचे या प्रोजेक्ट्चे क्हाईस प्रेसिडेंट (उपाध्यक्ष) प्रकीण जोशी यांनी आमदार सरनाईक यांना आश्सवासन दिले होते. मात्र कंपनीने आश्वासन न पाळता परप्रांतीयांना कामे दिली आहेत.
आंदोलनाचा इशारा
मेट्रो कास्टिंग यार्डच्या कामात डावलण्यात येत असल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी आज हे काम बंद पाडले. तसेच एक आठवडय़ात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन करून यार्डचे काम कायमचे बंद पाडण्याचा इशारा दिला. यावेळी डी. सी. पाटील, रवी घरत, महेश करवेरा तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सावीत्रीबाई शाळेतील घटना



























































