मुंबई ते बदलापूर प्रवास अवघ्या दीड तासात

2100
road

मुंबई आणि बदलापूरदरम्यान रस्तामार्गे रोज प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. या प्रवासाला साधारणपणे दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो ते अंतर आता दीड तासावर येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने या दोन शहरांदरम्यान एलिव्हेटेड मार्ग उभारला जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते पाऊण तासाने कमी होऊ शकणार आहे.

ऐरोली ते डोंबिवलीच्या कटाई नाकादरम्यान 33.8 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग उभारला जात आहे. आतापर्यंत त्याचे 30 टक्के काम पूर्णही झाले असून 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. मुंब्रा बायपासजवळ एक भुयारी मार्ग बनवून हा एलिव्हेटेड मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. मुंब्रा बायपासजवळील हा भुयारी मार्ग रबाळे ते मुंब्रा बायपास असा असल्याने त्याचा फायदा नवी मुंबई आणि कल्याणमधील नागरिकांनाही होणार आहे. या भुयारी मार्गामुळे नवी मुंबईहून कल्याणला जाण्यास पाऊण तास वाचणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या