उद्धव ठाकरे यांची तोफ आज गोरेगावात धडाडणार

20

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रचारानंतर आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदानी तोफ गोरेगाव पश्चिम येथील लक्ष्मी ऍसबेस्टॉस मैदानावर धडाडणार आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी गोरेगाव भगवेमय झाले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांत या सभेमुळे आगळे चैतन्य संचारले आहे.

लक्ष्मी एसबेस्टॉस कंपनी मैदान, अय्यप्पा मंदिर मार्ग, बांगूरनगर, गोरेगाव (प.) येथे होणाऱया या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांच्या तुकडे-तुकडे आघाडीवर आणि काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या भ्रष्ठाचारावर जोरदार हल्ला चढवणार आहेत. या प्रचारसभेत शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबई भाजपचे अध्यक्ष – आमदार आशीष शेलार, रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, विभागप्रमुख -आमदार ऍड. अनिल परब, विभागप्रमुख – आमदार सुनील प्रभू, उत्तर-पश्चिम भाजप अध्यक्ष-आमदार अमित साटम, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या