
बारावीचा निकाल 15 दिवस आधीच लागल्याने प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची प्रक्रिया यंदा मे-जून दरम्यान आटोपती घेऊन, 13 जूनपर्यंत कॉलेज सुरू करण्याची मुंबई विद्यापीठाची योजना आहे. त्यामुळे यंदा 13 जूनला शाळांबरोबरच कॉलेजही नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत.
एरवी संपूर्ण जून महिना प्रवेश प्रक्रियेत जातो. त्यामुळे कॉलेज सुरू व्हायला जुलै-ऑगस्ट उजाडतो. मात्र प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर यंदा पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 मे रोजीच जाहीर करण्याचे टार्गेट आहे.
जूनमध्येच कॉलेज सुरू झाल्यास विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक लवकर सुरू करता येईल. कोरोनामुळे विस्कटलेले पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक यामुळे मूळपदावर येण्यास मदत होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसे तास उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
विद्यापीठाशी संलग्नित स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांतील 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. 3 वर्षीय पदवी, 4 वर्षीय (ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च), 5 वर्षीय (इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टिपल एण्ट्री अँड मल्टिपल एक्जिट) अभ्यासक्रमांकरिता हे प्रवेश होतील. अनुदानित, विनाअनुदानित, बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- पहिली मेरीट लिस्ट – 27 मे, सकाळी 11 वाजता
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे
(हमीपत्र फॉर्मसह) – 28 मे ते 30 मे, दुपारी 3 वाजेपर्यंत - द्वितीय मेरीट लिस्ट – 31 मे, संध्याकाळी 7 वाजता
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे –
2 जून ते 4 जून, दुपारी 3 वाजेपर्यंत - तृतीय मेरीट लिस्ट – 5 जून, सकाळी 11 वाजता
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे –
6 जून ते 10 जून, दुपारी 3 वाजेपर्यंत - वर्ग सुरू होणार – 13 जून
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक
- अर्जविक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन) – 8 मे ते 23 मे 2025 (दुपारी 1.00 वाजेपर्यंत)
- प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – 8 मे ते 23 मे 2025 (दुपारी 1.00 वाजेपर्यंत)
- ऑनलाइन अॅडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – 8 मे ते 23 मे 2025 (1.00 वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस