
मुंबई विद्यापीठाचे दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) व काश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहराचे स्थित्यंतर व परिवर्तन या विषयावर 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी परिषदेचे आयोजन केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील फिरोजशहा मेहता भवनमध्ये ही परिषद होणार आहे.सध्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या शहरामध्ये राहत आहे. 2030 पर्यंत ही लोकसंख्या वाढून दोनतृतियांश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विविध संशोधनातून पुढे आली आहे. यामुळे या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुंबईतील जीवन, मुंबई शहराचे साहित्यातील प्रतिबिंब, मुंबईचे ऐतिहासिक महत्व, देशाच्या अर्थव्यवस्थेमधील मुंबईचे स्थान, शैक्षणिक विकास,मुंबई आज व उद्या, मुंबईचा ऐतिहासिक वारसा आदा rविषयावर या परिषदेत विचारमंथन होणार आहे. मुंबईसह देश व विदेशातील तज्ञपरिषदेत सहभागी होत आहेत. या परिषदेचे उद्घाटन सोमवारी सकाळी 10 वाजता राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते होईल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की हे परिषदेचे बीजभाषण करणार आहेत.






























































