पीएचडी व एमफिल प्रवेश परीक्षा ऑनलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठ पीएचडी व एमफिल प्रवेश परीक्षा (पेट) ऑनलाइन घेत असून या वर्षी प्रथमच दोन्ही परीक्षेसाठी विद्यार्थ्यास स्वतंत्रपणे अर्ज करता येणार आहेत. पीएचडीसाठी 78 विषयांत तर एमफिलसाठी 25 विषयांत ही प्रवेश परीक्षा होणार आहे. सदर परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. याचे ऑनलाइन अर्ज 27 फेब्रुवारीपासून उपलब्ध झाले आहेत.  ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2020 पर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. या परीक्षेस पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थीदेखील काही अटींच्या अधीन राहून अर्ज करण्यास पात्र राहतील. हे ऑनलाइन अर्ज विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.