बारीक व्हायचंय ? मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा !

1316

सामना ऑनलाईन । मुंबई

फिट राहायचं असेल तर वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. असा सल्ला तज्ज्ञमंडळी देत असल्याने हल्ली जो तो उठतो आणि वाढलेले वजन कमी करायच्या मागे लागतो. मग त्यासाठी जिम, डाएट याबरोबरच योगाही केला जातो. पण ऐकायला मजेशीर वाटेल की हे सगळे न करताही तुम्ही फक्त रडण्यानेही वजन कमी करू शकता. एका संशोधनात अश्रूंमुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते असे निदर्शनास आले आहे.

‘एशियन वन’ या मासिकात याबद्दल एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील माहितीनुसार रडल्याने आपल्या शरीरातून कॉर्टीसोन नावाचे हार्मोन्स स्रवतात. या हार्मोन्सची पातळी वाढल्याने वजन कमी होते.तर मानसिक ताण वाढल्यानंतर आपण जेव्हा रडतो तेव्हा आपल्या अश्रूंवाटे विषारी द्रव शरीराबाहेर पडतो. ज्याच्यामुळे वजन कमी होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच ज्यांना रडूच येत नाही. ज्यांच्या डोळ्यातून अश्रूच येत नाहीत किंवा ज्या व्यक्ती रडण्याचे ढोंग करतात अशा व्यक्तींचे वजन लवकर कमी होत नाही असेही संशोधनात आढळल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

सामान्यत तीन प्रकारचे अश्रू असतात. बेसल, रिप्लेक्स आणि सायकिक. बेसल अश्रू म्हणजे आनंदाश्रू .जे आनंदात असताना डोळ्यातून वाहतात. तर रिफ्लेस अश्रू म्हणजे जे प्रदूषणामुळे डोळ्यातून वाहतात. तर सायकिक अश्रू हे भावनेशी संबधित असतात. याच अश्रूंमुळे वजन कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यातही जर संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेदरम्यान रडल्याने वजन अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने कमी होते. रडल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीजही वेगाने घटतात. यामुळे संध्याकाळी रडणे केव्हाही चांगले असं या संशोधकांच म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या