
मुंबईसह राज्यभरात 26 आणि 27 डिसेंबर रोजी थंडीचा कडाका वाढणार आहे. तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घसरण होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तरेकडून येणाऱया कोरडय़ा आणि थंड वाऱयांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबई, विदर्भ, पुणे नाशिकमध्ये गारठा वाढेल, तर महाराष्ट्राच्या काही भागांसह छत्तीसगड आणि झारखंडमध्ये थंटीच लाट येणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.





























































